अर्थविश्व

Alert : एसबीआयची ही सुविधा दुपारपासून होईल ठप्प 

सकाळन्यूजनेटवर्क

SBI customers alert : एसबीआय म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या एसबीआयच्या इंटेरनेट बँकिगचा लाभ तुम्ही दुपारी साडेतीन तास घेऊ शकत नाही. एसबीआय इंटरनेट बँकिंग, योनो अॅप आणि योनो लाइट या सुविधा आज दुपारी साडेतीन तास बंद राहणार आहेत. एसबीआयनं ट्विट करत आपल्या ग्राहकांना याबाबतची माहिती दिली आहे. 

एसबीआयनं ट्विटद्वारे लोकांना सुचित केलं आहे. जेणेकरुन वेळेपूर्वीच ग्राहक आपली कामं आटोपतली. एसबीआयनं केलेल्या ट्विटनुसार, एक एप्रिल रोजी दुपारी २ वाजून १० मिनिट ते सायंकाळी पाच वाजून ४० मिनिटांपर्यंत इंटरनेट बँकिंग, योनो अॅप आणि योनो लाइट अॅपचा वापर करु शकत नाही. कारण या कालावधीत हे सर्व ठप्प राहणार आहे.  

एसबीआयनं आपल्या ऑनलाइन बँकिंग सिस्टमला अपग्रेड (अद्यावत) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुरुवारी एसबीआयच्या वरील सुविधा बंद राहणार आहे. एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, " ग्राहकांना चांहल्या आणि वेगवान ऑनलाइन बँकिंगची सुविधा देण्यासाठी इंटरनेट बँकिंग प्लेटफॉर्मला अपग्रेड करत आहोत. असुविधासाठी खेद आहे.

डिजिटल पेमेंट करताना ग्राहकांना होणाऱ्या अडचणींना समोरं ठेवून एसबीआयनं हा निर्णय घेतला आहे. सध्या ऑनलाइन सुविधा देण्यात एसबीआय आघाडीवर आहे. ग्राहांकांना येणाऱ्या अडचणी पाहून एसबीआयकडून वारंवार आपली सिस्टिम अपग्रेड करण्यात येते. आजही एसबीआयचं सर्व्हर अपग्रेड करण्यात येणार असल्यामुळे दुपारी साडेतीन तास सेवा बंद राहणार आहे..
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

१७ वर्षांनंतरही का आहे 'जाने तू... या जाने ना' ही चित्रपट सर्वांचाच लाडका सिनेमा– जाणून घ्या खास कारणं

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

SCROLL FOR NEXT